शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे दोन गरीब विद्यार्थ्यांचं भविष्य प्रकाशात - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे दोन गरीब विद्यार्थ्यांचं भविष्य प्रकाशात

Vidarbha News India:-
VNI:-
शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे दोन गरीब विद्यार्थ्यांचं भविष्य प्रकाशात 
 
विद्यार्थी घडविण्यासाठी राजेश खोब्रागडे सर यांच्यासारख्या शिक्षकांची खरी गरज 

गडचिरोली : लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा ही संस्था मागील ४९  वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. मागील वर्षीपासून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना NEET(वैद्यकीय प्रवेश परीक्षा) साठी मोफत प्रशिक्षण देत आहे. 
यावर्षी २०२२ मध्ये दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता आला . 
या हेमलकसा प्रकल्पामध्ये दोन वर्षीय निवासी प्रशिक्षणाकरीता तृप्ती खोब्रागडे व तनुश्री उराडे या दोन विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. त्यांची या हेमलकसा प्रकल्पाच्या ११ वि ,१२ वि आणि नीट प्रशिक्षणाकरिता निवड झाल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपलं यशाचे श्रेय त्यांना या प्रशिक्षणाची माहिती व फ़ॉर्म भरून देणारे व मेडिकल फिल्ड बद्द्ल मार्गदर्शन करणारे  व अभ्यासक्रम व मुलाखतीची तयारी करून देणारे या विद्यार्थ्यांचें मार्गदर्शक शिक्षक राजेश खोब्रागडे सर यांना या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपलं यशाचे श्रेय दिले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->