तो नरभक्षक वाघ होणार जेरबंद : वाघाचा शोध सुरू - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

तो नरभक्षक वाघ होणार जेरबंद : वाघाचा शोध सुरू

Vidarbha News India :-
VNI:-
तो नरभक्षक वाघ होणार जेरबंद : वाघाचा शोध सुरू 

गडचिराेली : देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर जंगल परिसरात मागील २० दिवसांच्या कालावधीत दाेन नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडाेबा येथील ९ जणांचे पथक दाखल झाले आहे.

१४ एप्रिल राेजी कुरूड येथील व ३ मे राेजी चाेप येथील एका नागरिकाचा शिवराजपूर जंगल परिसरात वाघाने बळी घेतला. विशेष म्हणजे शिवराजपूर जंगलात असलेला वाघ नरभक्षक असल्याची बाब वनविभागाच्या लक्षात आली. त्यामुळे सदर वाघाला पकडण्यासाठी १४ एप्रिलच्या घटनेनंतर देसाईगंज वनविभागाने वन्यजीव विभागाकडे परवानगी मागितली हाेती. या विभागाने परवानगी दिल्यानंतर २८ एप्रिल राेजी पथक दाखल झाले आहे. यापूर्वी नागझिरा अभयारण्यातील आठ जणांची टीम आली हाेती. ही टीम आता परत जात आहे. त्यामुळे ताडाेबा येथील ९ जणांची टीम बाेलाविण्यात आली आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून वाघाचा शाेध घेतला जात आहे. मात्र वाघ हुलकावणी देत आहे.

लाखांदूरवरून देसाईगंजात दाखल
नरभक्षक वाघाचे नाव सीटी-१ असे आहे. हा वाघ मूळचा ब्रम्हपुरी तालुक्यातील आहे. ताे काही दिवस लाखांदूर तालुक्यात हाेता. त्यानंतर हा वाघ देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर जंगलात दाखल झाला आहे. हा वाघ नरभक्षक असल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाने सुरूवातीपासूनच या वाघापासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना केले हाेते.

४० ट्रॅप कॅमेऱ्यांनी शाेध
वाघाला शाेधून काढण्यासाठी वनविभागाने शिवराजपूर, उसेगाव जंगल परिसरात विविध ठिकाणी ४० ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तसेच पथक जंगलात फिरून वाघाचा शाेध घेत आहे.

शिवराजपूर-उसेगाव मार्गावर रात्री प्रतिबंध
शिवराजपूर-उसेगाव हे चार किमीचे अंतर आहे. यादरम्यान जंगल आहे. याच परिसरात सदर वाघ आढळून येत आहे. रात्रीच्या सुमारास प्रवाशांना धाेका हाेऊ नये, यासाठी या मार्गावरून सायंकाळनंतर दुचाकी, सायकलस्वार व पायदळ व्यक्तीला जाण्यास प्रतिबंध घातला जातो. यासाठी शिवराजपूर व उसेगावच्या दाेन्ही बाजूला वनविभागाचा नाका तयार करण्यात आला आहे.

नागरिकांवर हल्ला करणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही सावधानता बाळगावी. जंगलात जाऊ नये. स्थानिक नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे.
- धर्मवीर सालविठ्ठल,
उपवनसंरक्षक, देसाईगंज

Share News

copylock

Post Top Ad

-->