जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी व शिक्षण विभागातील विविध योजनांची माहिती व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी व शिक्षण विभागातील विविध योजनांची माहिती व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन


Vidarbha News India :-
VNI:-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी व शिक्षण विभागातील विविध योजनांची माहिती व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

गडचिरोली : आयुक्त व  महासंचालक यांचे आदेशान्वये तालुका स्तरावर इयत्ता ११ वी १२ वी विज्ञान शाखेत तसेच सी. ई.टी,‍ नीट, जे.ई.ई. व्दारे व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करताना बऱ्याच अडचणी येत असून व बरेची अर्जदार त्रृटीयुक्त प्रकरणे सादर करत असल्याने याबाबत तालुका स्तरावरील जात वैधता प्रमाणपत्राबाबत प्रशिक्षण शिबीर महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी ता. आरमोरी जि.गडचिरोली येथे ०५ मे २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजीत करण्यात येत आहे. तरी आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची या तालुक्यातील ‍ कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, लिपीक तसेच अर्जदार व पालक यांनी सदर प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा.
तसेच सन-२०२१-२२ या सत्रात समितीकडे जात वैधता प्रमाणपत्राचा प्रस्ताव सादर केलेला आहे. परंतु आज पावेतो जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, असे प्रस्ताव त्रृटीमध्ये आहेत. अशा या तीन तालुक्यातील अर्जदारांनी सदर प्रशिक्षण स्थळी सर्व मुळ पुरावे व मानीव दिनांकाचा जात व अधिवास पुराव्यासह उपस्थित राहावे, असे आवाहन उपायुक्त  तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली देवसुदन धारगावे यांनी केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->