वनविभागाने काढले १३ हेक्टरवरील अतिक्रमण - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

वनविभागाने काढले १३ हेक्टरवरील अतिक्रमण

Vidarbha News India:-
VNI:-
वनविभागाने काढले १३ हेक्टरवरील अतिक्रमण 

गडचिरोली/देसाईगंज : वडसा वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनपरिमंडळ अंतर्गत चोप नियतक्षेत्रातील कोरेगाव रावनवाडी येथे कक्ष क्रमांक १०४ राखीव वनामध्ये असलेले ३६ लोकांचे १३.०० हेक्टर क्षेत्रातील अतिक्रमण शनिवारी हटविण्यात आले.

अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, वडसाचे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.व्ही.धांडे, अविनाश मेश्राम, मधुकर मेश्राम, कुंभलकर, फिरते पथक अधिकारी आंबटकर, पोलीस निरीक्षक महेश मसराम, शंकरपूरचे क्षेत्रसहायक व्ही.एच.कंकलवार, एस. कानकाटे आदींनी केली. इतरही ठिकाणचे अतिक्रमण हटवावे.

वनपट्ट्यांची नाेटरी करून विक्री
- देसाईगंज तालुक्यात किन्हाळा,मोहटोला परिसरात पुनर्वसित किन्हाळा व अरततोंडी या ठिकाणी फार पूर्वीला वनविभागाकडून वनपट्टे देण्यात आले होते. वनपट्ट्यांची ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला लागून असल्याने या जागेला सोन्याची किंमत येत आहे. त्यामुळे काही वनपट्टेधारक या जमिनीची नोटरी पद्धतीने दुसऱ्याला विक्री करून देत आहेत.
- कृषी प्रयोजनार्थ वनविभागाने पट्टा म्हणून दिलेल्या या जमिनीची दुसऱ्याला विक्री करता येत नाही; मात्र याचे उल्लंघन हाेत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->