VNI:-
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे निवेदन ; कंत्राटी कामगारांच्या समस्येचे निवारण करा
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे कंत्राटी कामगारांच्या समस्या मुख्य अभियंता यांचेकडे निवेदनातुन सादर
आज महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री हेमराज गेडे यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चंद्रपूर झोनअंतर्गत येत असलेल्या चंद्रपुर सर्कल मधील तसेच गडचिरोली सर्कल मधील विविध कंत्राटदारामार्फत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगाराना भेडसावत असलेल्या समस्यांवर चंद्रपूर झोनचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे साहेब व अधीक्षक अभियंता सौ.संध्या चिवडे मॅडम यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट घेऊन समस्यांचे निवेदन देण्यात आले. व इतर प्रलंबित असलेल्या व सातत्याने भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली त्यावर उभय अधिकाऱ्यांनी लवकरच बैठकीचे आयोजन करून समस्येचे निवारण केले जाईल असे सांगितले त्यावेळेस चंद्रपूर सर्कलचे बरेचसे बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार उपस्थित होते.