VNI:-
होय! 'जिवाची होतिया काहिली त मुख्य नायिकेच्या भूमिकेत गडचिरोलीची प्रतिक्षाच
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : 'जीवाची होतीया काहिली' ही नवी मालीका आजपासून सोनी मराठी या टिव्ही चॅनलवर सुरू होत आहे. या मालिकेमध्ये मुख्य नायिकेच्या भूमि शिवाजी हायस्कूल चामोर्शीची माजी विद्यार्थीनी प्रतिक्षा शिवणकर झळकणार आहे
सिने क्षेत्रातील प्रतिक्षाच्या या उंच भरारीने गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.
गडचिरोली शहरानजीकच्या खरपूंडी जि.प शाळेतील शिक्षक सुनिल शिवणकर व दिभना येथील जि.प. शाळेतील मुख्याध्यापिका भारती शिवणकर यांची प्रतिक्षा ही कन्या आहे. चामोर्शी येथील शिवाजी हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. प्रशांत दामले यांच्या फॅन्स फॉऊंडेशन निर्मित 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या व्यावसायिक नाटकातून प्रतिक्षाने नाट्यसृष्टीत पदार्पण केले होते. या नाटकाचा देखील नुकताच ५०० वा नाट्यप्रयोग झाला. त्यानंतर प्रतिक्षाने 'कॉलेज डायरी' नावाचा सिनेमा देखील केलाय. लॉकडाऊननंतर तिने 'कॉमेडीबिमेडी' नावाचा शो देखील केलाय. शिवाजी हायस्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य पारंगत झालेली प्रतिक्षा ही मुळची गडचिरोलीची असुन शिक्षणासाठी पुण्याला गेली.
एकदा तरी ऑडिशन देण्याची तिची ईच्छा तिला प्रशांत दामले यांच्या ''टी स्कूल थिएटर अकादमी'' मध्ये घेवून गेली. तिथे' प्रतिक्षाची निवड झाल्यानंतर तिला नृत्य व अभिनयाचे धडे मिळाले. तिचा अभिनय बघून तिला अकादमी तर्फे स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे दोन वर्षे तिला विनामुल्य प्रशिक्षण मिळाले.त्यानंतर प्रशांत दामले यांच्याच ""एका लग्नाची पुढची गोष्ट" या नाटकासाठी तिला ऑडिशनला बोलावण्यात आले. त्यासाठी तिची निवड झाल्यानंतर प्रतिक्षाचा आत्मविश्वास द्विगुणित होत गेला. त्यानंतर तिने 'कॉलेज डायरी' चित्रपटात, कॉमेडी-बिमेडी शो मध्ये भाग घेतला.