VNI:-
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन बुलडाणा सर्कल तर्फे धरणे आंदोलन करण्याचे आवाहन !..
विदर्भ न्यूज इंडिया:-
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन बुलडाणा सर्कल मधील कंत्राटी आऊटसोर्स कामगार यांच्या विविध प्रश्नाबाबत संघटनेने अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. मंडळ कार्यालय, बुलडाणा यांना विस्तृत पत्र व नोटीस दिली होती व त्यांच्या सोबत दिनांक दिनांक २२ जून २०२२ रोजी चर्चा सुधा केली होती. परंतु कामगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. याउलट कंत्राटदाराकडून दरमहा पैशाची मागणी करणे, न दिल्यास कामावरून कमी करण्याची धमकी देणे. काही ठिकाणी नेमणुकीच्या आदेश न देणे, काही जुन्या कंत्राटी कामगार यांना मुद्दाम डावलून नवीन कंत्राटी कामगार नेमणे असे प्रकार सर्रास सुरू आहे. कंत्राटदाराने स्थानिक व्यक्ती कडून त्यांच्या मार्फत कंत्राटी कामगार यांच्या कडून पैशाची मागणी व धमकी हे प्रकार सुरू आहेत. या सर्व समस्यामूळे
कंत्राटी कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. यासर्व प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी व अश्या पद्धतीने वागणाच्या कंत्राटदारांना वटनीवर आणण्यासाठी संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाप्रमाणे दिनांक २७.०७.२२ रोजी प्रधान नियोकत्ता म्हणून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने अभियंता कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल यांची कृपया नोंद घ्यावी, निर्माण होणाऱ्या औद्योगिक शांततेस संघटना जबाबदार राहणार नाही. असे आव्हान महारष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन बुलडाणा चे सकंल सचिव मंगेश कानडे यांनी नोटीस व पत्राद्वारे अधिकाऱ्यांना माहिती कळवले.