गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Vidarbha News India:-
VNI:-
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित  
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या कार्याची दखल घेवून नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘IACP’, व्हर्जिनीया युनिव्हर्सिटी (International Association of Cheifs of Police) चा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अवार्ड घोषीत करण्यात आला असून, गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी तर्फे मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ‘IACP’ चा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अवार्ड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मागास घटकांसाठी उत्कृष्ठ काम करणा­या संस्था व व्यक्तींसाठी दिला जातो. या पुरस्कारामध्ये Best in Large Agency या विभागातुन गडचिरोली पोलीस दलाची निवड करण्यात आली आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन जिल्ह्रातील दुर्गम-अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील वृध्द, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती, आत्मसमर्पीत, नक्षलपिडीत तसेच आदिवासी नागरिकांच्या विकासाबाबत गांभिर्याने विचार करून गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती शाखेंतर्गत पोस्टे / उपपोस्टे व पोमकेंच्या 53 ठिकाणी ‘पोलीस दादालोरा खिडकी’ सुरू केल्या आहेत. या पोलीस दादालोरा खिडकीमधून एकाच ठिकाणी नागरिकांना  1) प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र 2) प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना 3) विविध प्रकारचे दाखले 4) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 5) व्होकेशनल ट्रेनिंग व रोजगार योजना 6) अग्निवीर ऑनलाईन अर्ज 7) प्रोजेक्ट कृषी समृध्दी 8) प्रोजेक्ट शक्ती तसेच शासनाचे इतर विविध उपक्रमाच्या माध्यमातून दोन लाखांचेवर दुर्गम व नक्षलग्रस्त भागापर्यंत पोहचून विविध योजनेचा लाभ मिळवून दिला आहे व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन 2,14,538 नागरिकांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळालेला असून, प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र- 9,026, प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना- 55,320, विविध प्रकारचे दाखले- 1,20,705, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना- 169, व्होकेशनल ट्रेनिंग व रोजगार योजना- 5,641, अग्निवीर ऑनलाईन अर्ज- 173, प्रोजेक्ट कृषी समृध्दी- 11,633, प्रोजेक्ट शक्ती- 1,546 व इतर उपक्रम-10,325 अशाप्रकारचा लाभ नागरीकांना मिळवुन देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्राच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, पोलीस दलास अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. गडचिरोली जिल्हयातील उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पोमके येथील सर्व अधिकारी / अंमलदार यांनी या आव्हानांना स्विकारुन जिल्हयातील गरजु आदिवासी बांधवांपर्यंत जावुन पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन विविध शासकिय योजनांचे लाभ मिळवुन देण्यासाठी परिश्रम घेवुन उत्कृष्ठ कामगिरी पार पाडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘IACP’ चा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अवार्ड जाहिर झाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्यावतीने मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी जिल्हयातील सर्व अधिकारी/अंमलदार यांचे कौतुक केले असुन भविष्यात देखिल ते अशीच कामगिरी करतील ही अपेक्षा व्यक्त केली.

Share News

copylock

Post Top Ad

-->