VNI:-
भाजपा महिला मोर्चा तर्फे गडचिरोली साई मंदिरात"राखी मेकिंग व निबंध स्पर्धा संपन्न
- 28 शाळेतील 58 विद्यार्थ्यांनी घेतला स्पर्धेत
सहभाग
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली: भाजपा महिला मोर्चा तर्फे भाजपा प्रदेश सदस्य रेखाताई डोळस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली साई मंदिर येथे "रक्षा बंधन" सना निमित्त 5 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांन करीता नव नविन राखी मेकिंग व निबंध या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात रेखाताई डोळस म्हणाल्या भाजपा महिला मोर्चा तर्फे पहिल्यांदाच राखी सना बाबत नवनवीन राखी मेकिंग व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत 28 शाळेतील 58 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता राखी मेकिंग स्पर्धेत लक्की चापले यानी प्रथम बक्षीस मिळविले असुन द्वितीय,तृतीय व चतुर्थ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले तर निबंध स्पर्धेत प्रनव गड्डमवार यानी प्रथम बक्षीस मिळविले,द्वितीय, तृतीय बक्षीसा सह 6 प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले.दोन्ही स्पर्धेतेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना पेन संच अस प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. दर वर्षाला असा कार्यक्रम घेतला जाईल असे त्या म्हणाल्या...
राखी मेकिंग व निबंध स्पर्धा कार्यक्रमाचे उदघाटन प्रशांत जी वाघरे,भाजपा जिल्हा महामंत्री यानी केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. मिलिंदजी उमरे होते. प्रमुख अतिथी श्री प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस(संघटन),भाजपा STM, महाराष्ट्र हे होते, मंचावर विलास पाटील भांडेकर ता. संपर्क प्रमुख.मा.गीताताई हिंगे,मा.रंणजीताई कोडाप मा.सभापती,मा.वच्छलाताई मुनघाटे,मा.लताताई पुंगाटि रुमनताई ठाकरे उपसरपंच पुलखल.,मा.सलीमभाई,मा प्रिती मॅडम कातरकर, मा.मुजुमदार मॅडम, मा.पुष्पाताई करकाडे,मा.अली मॅडम, मा.पठाण मॅडम, मा.श्रीकांत जी कातरकर,मा.रमेश जी डोळस, मा.रितुताई कोलते मा.नगरसेवक,मा.वर्षा नैताम मा.नगरसेविका,मा.बोरकुटे जी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.