VNI:-
क्रींडागणाच्या बांधकामाला लवकरच होणार सुरुवात : आ. डॉ. देवरावजी होळी
- आ. डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीमध्ये चामोर्शी क्रीडांगणाच्या सफाई कामाला सुरुवात
- क्रीडांगणाच्या परिसराची आ. डॉ. देवराव होळी यांनी केली पाहणी...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/ चामोर्शी : मागील अनेक वर्षांपासून बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या चामोर्शी तालुका क्रीडांगणाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली आहे. आ. डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीमध्ये या क्रीडांगणाच्या परिसराच्या स्वच्छतेच्या, साफसफाईच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुका क्रिडा अधिकारी भटकलवार, मोजनी अधिकारी ठाकरे, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, प्रतीक राठी, विजय गेडाम, राकेश खेवले, राकेश बेलसरे, पुरुषोत्तम बोरकूटे, तारक हलदार, पोषक गेडाम, यांचे सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
चामोर्शी तालुक्याच्या क्रीडांगणासाठी सातत्याने आ. डॉ. देवराव होळी प्रयत्नरत असून या कामाला प्रथम प्राधान्याने कशी सुरुवात करता येईल यासाठी ते काम करीत आहेत. यासंबंधित विभागाचे अधिकारी यांच्या वारंवार बैठका घेवून त्याबाबत संपर्कात आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारकडून त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधीसाठी त्यांनी विविध मंत्र्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. आपल्या प्रयत्नातून लवकरच यासाठी लागणारा निधी उपलब्ध होणार असून लवकरच या क्रीडांगणाच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती या परिसराची पाहणी करताना आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली.