भाजपा च्या वतीने आज चामोर्शी येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने हरघर तिरंगा बाईक रॅली संपन्न... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

भाजपा च्या वतीने आज चामोर्शी येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने हरघर तिरंगा बाईक रॅली संपन्न...

Vidarbha News India:-
VNI:-
भाजपा च्या वतीने आज चामोर्शी येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने हरघर तिरंगा बाईक रॅली संपन्न...
- शहरातील शेकडो युवकांनी बाईक रॅलीत स्वयंस्फूर्तीने घेतला सहभाग
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आझादी का अमृत महोत्सव निमित्याने भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या  वतीने आज चामोर्शी  शहरातील मुख्य मार्गावरून बाईक वर तिरंगा लाऊन येथील शेकडो युवकांची भव्य यशवी तिरंगा यात्रा निघाली
या तिरंगा यात्रेत भाजपा युवा मोर्चा, महिला आघाडी, सर्व आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी स्वयम स्फुर्तीने सहभाग घेवुन आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी व हर घर तिरंगा अभियान संदेश देण्यासाठी तथा सामाजिक एकता व देश भक्ती संदेश देण्यासाठी स्थानिक चामोर्शी येथील लक्ष्मी गेट मुख्य चौक येथे  बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी एकत्रित आले यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे,नगरसेवक आशीष पिपरे तुषार भाऊ दूधबावरे व सोशल मीडिया संयोजक गडचिरोली विधानसभा रमेश अधिकारी युवा नेते निखिल धोडरे यांनी तिरंगा यात्रेचे नेतृत्व केले या तिरंगा यात्रेत शहरातील, पाचशेच्या वर  युवक स्वयम् स्फुर्तीने सहभागी झाले होते या रॅलीला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्र,सो, गुंडावार गुरुजी यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले सदर रॅली आधी बस स्टँड मार्गाने एच पी, पेट्रोल पंप समोरून वडसा घेऊन पंचायत समिती समोरून आष्टी मार्गाने तहसील कार्यालय समोरून पुन्हा बस स्टँड मार्गाने वाळवंटी चौक होत, पोलीस स्टेशन समोरून सोसायटी समोरून मुख्य मार्केट लाईन मधून बाजार येथील शहीद स्तंभ जवळ जमा झाले यावेळी पावसाने हजेरी लावली परंतु येथील युवकांनी पुन्हा चवडेश्र्वरी मंदिर समोरून अलंकार पेट्रोल पंप समोरून लक्ष्मी गेट होत बाजार चौक येथील शहीद स्मारक येथे आले पुन्हा शहीद  यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा रॉय, नगरसेविका रोशनी ताई वरघंटे,गीता ताई सोरते सोनाली ताई पिपरे, युवा नेते नरेश अल्सावार, रेवनाथ कुसराम, लक्ष्मण वासेकर, विनोद किरमे,शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रामुख्याने स्थानिक बाजार चौक येथे शहीद स्तंभा समोर मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली व राष्ट्रगीत म्हणून या रॅलीचे समारोप करण्यात आले.

Share News

copylock

Post Top Ad

-->