VNI:-
गोंडवाना विद्यापीठात तिरंगा ध्वजाचे वितरण...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात हर घर तिरंगा अभियानाची जोरात तयारी सुरु आहे. विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना, विद्यार्थी तसेच विद्यापीठ परीसरातील नागरिकांना, विद्यापीठात येणाऱ्या अभ्यागतांना तिरंगा ध्वजाचे वितरण आज करण्यात आले. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज देऊन ध्वज वितरणास सुरूवात केली.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. शाम खंडारे यांचीही उपस्थिती होती.
१३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत संपूर्ण देशात घरोघरी तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे . त्याअनुषंगाने, १३ ऑगस्ट ला सकाळी ७.३० वाजता. तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे. यानंतर सर्व संविधानिक अधिकारी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवतील. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.
तिरंगा आणि सेल्फी विद्यापीठाच्या प्रांगणात तसेच विद्यापीठात ठेवलेल्या सेल्फी पॉईंटवर राष्ट्रध्वजासह सेल्फी काढण्यासाठी अनेक विद्यार्थी तसेच अभ्यागतांनी गर्दी केली होती.