VNI:-
भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुर तर्फे
क्षय रुग्णांना अन्नधान्य किट चे वाटप या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी : मा.खा.अशोकजी नेते...
- भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चंद्रपुर च्या वतीने ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल यांच्या नेतृत्वात सिंदेवाहि येथे कार्यक्रम संपन्न...
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर/सिंदेवाही : भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चंद्रपूरच्या वतीने काल दि २७ सप्टेंबर रोजी क्षयरोग मुक्त भारत २०२५ या सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत मा.खा.अशोकजी नेते यांच्याकडून क्षय रुग्णांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खा.अशोकजी नेते बोलतांना भारत हा देश २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त झाला पाहिजे.हे स्वप्नं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आहे.ते पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणा ( NGO). एनजीओ यांनी पुढाकार घ्यावा. या योजनेत सामील व्हावे. आणि या देशाला विश्ववात एक नंबरचा देश झाला पाहिजे असे प्रतिपादन खा.अशोकजी नेते यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमा प्रसंगी मान.प्रा.अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रम्हपुरी, ओबीसी आघाडी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, तालुकाध्यक्ष राजेंद्र पा. बोरकर, डॉ.साठे,या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मा.खा.अशोकजी नेते, गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, मा.अतुलभाऊ देशकर माजी आम.ब्रम्हपुरी,ओबिसी आघाडी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल,ता.अध्यक्ष मा. राजेंद्र बोरकर, माजी सभापती समा.क.मान. नागराजजी गेडाम, तहसिलदार गणेश जगदाळे, बिडिओ अक्षय सुकरे,थानेदार घारे साहेब, भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष श्री देवराव कोठेवार यु.मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा माजी.पं.स.सदस्य रितेशजी अलमस्त, डॉ.साठे जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ मानकर, किशोर मानुसमारे,मनोहर सहारे ता.महामंत्री,मधुकरजी मडावी माजी सभापती,अरविंद राऊत सर माजी सभापती, किशोर भरडकर, देवा मंगलवार,आशिष चिंतलवार, पुस्तोडेताई नगरसेविका, चिंतलवारताई नगरसेविका,तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.