VNI:-
सावली तालुक्यात लंपी अजारावर लसीकरनाला वेग
विदर्भ न्यूज इंडिया
तालुका प्रतिनिधी सावली :- बंडू मेश्राम
कोरोना सारख्या खतरनाक महामारीचा सामना केल्यानंतर आता कुठे स्थिती सामान्य व्हायला लागली आहे तेवढ्यातच मूक्या जनावरावर लंपी वायरस चा धोका निर्माण झाला आहे. आज पर्यंत राजस्थान गुजरात सोबत दहा वेगवेगळ्या राज्यांमध्ये या भयानक वायरस संक्रमण झाले आहे. महाराष्ट्रात सर्वात अगोदर लंपी हा आजार ४ आगस्ट २०१९ ला जळगाव जिल्ह्यामध्ये आढळून आला. लंपी वायरस हे जनावरांचा होणारा स्किन रोग आहे ज्यामध्ये जनावरांना शरीरावर गाठ येणे, चट्टे येणे, ताप येणे, पायांना सूजन, वजन कमी होणे, लाळ वाहणे आणि डोळे तसेच नाकातून पाणी वाहणे अशी लक्षणे आढळून येतात.
आजपर्यत तालुक्यात एकही लंपी संधिग्ध जनावरे नाहीत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. सावली तालुक्यात लंपी या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुकाभर लसीकरणाची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे या रोगाची लक्षणे व प्राथमिक उपचार पध्दती यावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे असा एकच सूर निघत आहे.
"७५०० लस उपलब्ध झाली पैकी पूर्ण लसीकरण झाले आहे. जसे लस उपलब्ध होतील तसा आणखी लसीकरणाचा वेग वाढवू. सद्या तालुक्यातील प्रत्येक गावात लंपी आजाराविषयी जागरूकता निर्माण केली जात आहे."
- - - श्री. ज्ञानेश्वर कापगते
पशुधन विकास अधिकारी
पंचायत समिती सावली.