अरण्यवास बुद्धविहार कोठरी येथे उद्या २७ ला वर्षावास समापन सोहळा...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील अरण्यवास बुद्ध विहार नाला संगम कोठरी - माडे मुधोली येथे दर वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळी भाऊबिजच्या दुसऱ्या दिवशी उद्या दि.२७ ऑक्टोंबर २०२२ रोज गुरुवारला. पुज्य भन्ते भागीरथ' कोठरी' तसेच भन्तेगण याच्या उपस्थितीत त्रिशरण - पंचशिला ग्रहण करून भोजन दानानंतर दुपारी १२.३० वाजता भव्य सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर, सामाजीक कार्यकर्ता जिल्हा गडचिरोली हे राहणार असुन प्रमुख मार्गदर्शक म्हणून भन्ते भागीरथ, माजी खासदार प्रा. जोर्गेंद्र कवाडे सर नागपूर, आमदार डॉ . देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी जि.प. सदस्य अँड. राम मेश्राम, अँड विनय बाबोळे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती विलास दशमुखे, प .स.गडचिरोली, प्रा. राजेश कात्रटवार, डॉ विजय रामटेके ' इंजि . विजय मेश्राम, नरेश रामटेके, डॉ चंद्रशेखर बांबोळे, जि के . बारसिंगे, बाळकृण बांबोळे, मारोती भैसारे, मंगला मानकर, सुशिला भगत, संघमित्रा उंदिरवाडे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याला उपस्थित राहणार्या नागरिकांची व्यवस्था व्हावी म्हणुन रात्रौ - मी योद्धा भिमा कोरेगावचा या नाटकाचा प्रयोग दाखविण्यात येणार आहे. तरी लाखोच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन जमनादास मेश्राम, प्रविण मुजुमकर, प्रवेश बांबोळे, लता भैसारे, माया सोरते, तसेच कोठरी, माडे मुधोली, हळदवाई येथील बौद्ध समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे .