कोनसरीच्या लोहप्रकल्पात अपघात; ट्रकखाली दबून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

कोनसरीच्या लोहप्रकल्पात अपघात; ट्रकखाली दबून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

Vidarbha News India - VNI

कोनसरीच्या लोहप्रकल्पात अपघात; ट्रकखाली दबून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

विदर्भ न्यूज इंडिया

 गडचिरोली/ आष्टी : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लोहप्रकल्पात गुरुवारी गिट्टीने भरलेला ट्रक ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाला.

ही घटना २७ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. मिथुन निर्मल मंडल (३८ वर्षे, रा. बहादूरपूर) असे मृताचे नाव आहे. कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पात ट्रॅक्टर व ट्रकने गिट्टी आणून रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी गिट्टीने भरलेल्या हायवा ट्रकमधील गिट्टी खाली करणे सुरू असताना तो ट्रक अनियंत्रित होऊन ट्रॅक्टरवर उलटला. त्यामुळे ट्रॅक्टर चालक मिथुन त्याखाली दबल्या गेला. त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूला गंभीर जखम झाल्याने त्याला उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत मिथुन याच्या मागे पत्नी, तीन मुली व आईवडील असा परिवार आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->