VNI:-
गोंडवाना विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे निकाल जाहीर
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातर्फे सुरु असलेल्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे निकाल आले आहे. या स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील संघ सहभागी झाले होते. या आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये आर्चरी, स्विमिंग, मल्लखांब, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कबड्डी, हॉकी, क्रिकेट, हँडबॉल, मिनी गोल्फ, कराटे या आणि इतर स्पर्धांचा समावेश आहे.
या स्पर्धांना योगासन स्पर्धेपासून सुरुवात झाली असून महिलांच्या गटातून चिंतामणी सायन्स कॉलेज , पोभुर्णा प्रथम ,एन. एच. कॉलेज ब्रह्मपुरी द्वितीय आणि आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा तृतीय स्थानी राहीला. संतोष शर्मा यांनी योगासन स्पर्धेचे संयोजन केले. संघ निवडीसाठी डॉ. महेश जोशी आणि संघपाल नारनावरे यांनी सहकार्य केले.
महिलांच्या व्हालीबॉल गटात सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर प्रथम, लोकमान्य महाविद्यालय, वरोरा द्वितीय,श्री. जे .एस .पी. एम. महाविद्यालय धानोरा यांनी तृतीय स्थान पटकावले. संघ निवडीसाठी डॉ.अनिस खान, डॉ.मुरलीधर रुकमोडे, डॉ.आनंद वानखेडे यांनी भूमिका बजावली.
महिलांच्या खो-खो संघात सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर प्रथम, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, द्वितीय तर तृतीय स्थानी महिला महाविद्यालय गडचिरोलीचा संघ राहिला. निवडीसाठी डॉ.ज्ञानेश्वर ठाकरे, डॉ.संगीता बांबोडे, डॉ.प्रकाश वैद्य यांनी सहकार्य केले. डॉ. ज्ञानेश्वर ठाकरे यांनी स्पर्धेचे संयोजन केले. भारतीय आंतरविद्यापीठ आणि पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी या स्पर्धांमध्ये उतरलेल्या विविध महाविद्यालयांमधून विद्यापीठाचा संघ तयार होणार आहे.
स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. संचालक शारीरिक क्रीडा विभाग डॉ. अनिता लोखंडे यांच्या मार्गदर्शनात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा सुरू आहे.