शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना १६४ व्या शहिद दिनानिमित्त विनम्र अभिवादन; खा.अशोकजी नेते - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना १६४ व्या शहिद दिनानिमित्त विनम्र अभिवादन; खा.अशोकजी नेते

शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना १६४ व्या शहिद दिनानिमित्त विनम्र अभिवादन; खा.अशोकजी नेते
१८५७ चे विर शहिद विर बाबुराव शेडमाके यांच्या १६४ व्या शहिद दिनानिमित्त शहिद विरांचे स्मरण या कार्यक्रमाचे उद्घाटक. मा.खा.अशोकजी नेते
शहिद दिनानिमित्त गोटुल भुमी चातगांव येथे विनम्र अभिवादन व सांस्कृतिक जतन
विदर्भ न्यूज इंडिया
(धोनोरा) चातगांव : देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी निमित्ताने विर शहिद बाबुराव शेडमाके यांच्या १६४ व्या शहिद दिनानिमित्ताने शहिद विरांचे स्मरणार्थ उद्घाटक प्रसंगी मा.खासदार अशोक जी नेते यांनी बोलतांना वीर बाबुराव शेडमाके, गडचिरोली क्षेत्राच्या इतिहासात आदिवासींच्या संघर्षाला अजरामर करून गौरव शाली प्रतिकार युद्धाची मांडणी करून गेला आहे. व तो आजही वर्तमानातील शोषणा विरोधातील इथल्या संघर्षांना प्रेरणा देत आहे. येन तरुण वयात शोषणा विरोधात त्याने आवाज उचलून, जनतेला संघटीत करून विद्रोह उभा केला. आदिवासी क्षेत्रात होत असलेला परीकीयांचा शिरकाव, इंग्रजांचे वाढते अन्याय यांच्या विरोधात व जल जंगल जमिनीच्या अधिकारासाठी त्यांने विद्रोह पुकारला. केवळ २५ वर्षाच्या त्या शूरवीराने खऱ्या स्वातंत्र्यासाठी शसस्त्र संघर्ष उभा केला.असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.
गोटूल समिती,हिरा सुखा आदिवासी बहुउद्देशीय संस्था चातगांव ता. गडचिरोली च्या वतीने १८५७ चे  शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा १६४ व्या शहीद दिन कार्यक्रम देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शहिद विरांचे स्मरण गोटुल भुमी चातगांव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या निमित्ताने पार्वताबाई सिडाम १०४ वर्षीय या महिलेने आदिवासी सांस्कृतिचे जतन व प्रबोधन केल्याने तसेच मिस.इंडियाच्या मनिषाताई मडावी यांचे सत्कार करण्यात आले.यावेळी सिकलसेल कॅम्प, क्षयरोग तपासणी, रक्तदाब, शुगर तपासणी सुध्दा करण्यात आले. 
यावेळी खा. अशोक नेते यांच्या हस्ते  रॅलीची सुरूवात करण्यात आली.
या कार्यक्रमा प्रसंगी मा. आम. रामदासजी आंबडकर यानी मार्गदर्शन करतांना वीर बाबुराव शेडमाके यांनी अल्प आयुष्यात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरोधात लढा दिला.असे प्रतिपादन यावेळी केले.तसेच याप्रसंगी माजी आम.हिरामणजी वरखडे,प्रकाशजी गेडाम,देवाजी तोफा,इत्यादींनी सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी खासदार श्री.अशोकजी नेते गडचिरोली /चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती मोर्चा, विधानपरिषदचे आमदार डॉ.रामदासजी आंबडकर, माजी.आमदार हिरामणजी वरखडे,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाशजी गेडाम, देवाजी तोफा सामाजिक कार्यकर्त,दादाश्री मसराम, गोपाल ऊईके सरपंच, रंजिताताई कोडापे माजी सभापती,सुनिताताई मडावी सामाजिक कार्यकर्त्यां,विजय कुमरे ता.महामंत्री,आशिष पिपरे नगरसेवक चामोर्शी,अनिल पोहनकर, प्रशांत भुगुवार, प्रविण मडावी,दिलिप उसेंडी,सुकरु जुमनाके,दशरथ पुंघाटे, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->