प्राथमिक शिक्षक संघाची निवेदनाद्वारे मागणी; २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नये - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

प्राथमिक शिक्षक संघाची निवेदनाद्वारे मागणी; २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नये

Vidarbha News India:-
VNI:-
प्राथमिक शिक्षक  संघाची निवेदनाद्वारे मागणी; २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नये...                                                
- महाराष्टृ राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गडचिरोली; जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नये.                                                 
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : प्राथमिक शिक्षक  संघाची निवेदनाद्वारे मागणी. गडचिरोली दि.१४, नविन भरती  करण्याऐवजी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन तेथील शिक्षकांचे आवश्यक ठिकाणी समायोजन करावे. याबाबतची माहीती शासनाने मागवली आहे.त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्येंच्या शाळा बंद होणार अशी भिती निर्माण होऊन शैक्षणिक वर्तुळात तीव्र नाराजी पसरली आहे.                                
२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंदच्या निर्णयामुळे गडचिरोली  जिल्ह्यातील आदिवासी गोरगरिब,वंचित,उपेक्षित,दुर्गम, अतिदुर्गम,जंगलव्याप्त वाड्या-वस्तीवरील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबण्याची शक्यता आहे.यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे.             
तसेच २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्यानंतर या भागातील मुलांना दुर अंतरावरील शाळांमध्ये जावुन शिक्षण घेणे अडचणीचे ठरु शकते. परिणामी त्यामुळे अशा भागातील मुले  शिक्षणाच्या सोईपासुन वंचीत राहण्याची शक्यता आहे. म्हणुन वरील सर्व बाबींचा व गडचिरोली जिल्ह्यातील भौगौलिक परिस्थितीचा विचार करुन गडचिरोली जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नये, अशी मागणी महाराष्टृ राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतीने मा.मुख्यमंञी श्री एकनाथजी शिंदे साहेब मा.उपमुख्यमंञी तथा पालकमंञ श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.शालेय शिक्षण मंञी;श्री दिपकजी केसरकर साहेब,मा.सचिव शालेय शिक्षण विभाग; श्री रणजितसिंग देओल साहेब, मा जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मिना साहेब यांचेकडे  केलेली आहे.    
जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नये. यासंदर्भातील निवेदन दि.१४/१०/२०२२ ला मा.निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी श्री समाधान शेंडगे साहेब यांचेकडे देण्यात आले आहे.        
याप्रसंगी निवेदन देतांना महाराष्टृ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष; श्री रघुनाथ भांडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीमती शिलाताई सोमनकर,जिल्हा कोषाध्यक्ष; राजेश चिल्लमवार, जिल्हा उपाध्यक्ष; श्री सुरेश वासलवार, श्री अशोक रायसिडाम, जिल्हा सल्लागार; श्री निलकंठ निकुरे, श्री विनोद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष;  धनेश कुकडे, राजु मुंडले,तेजराज नंदगिरवार तेजराज नंदगिरवार,                  तालुकाकार्याध्यक्ष; अशोक बोरकुटे,                        संघटक; बालाजी पवार,श्री नाईकवाडे,श्री नुदनुरे,श्री अंबादास पाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Share News

copylock

Post Top Ad

-->