Wild Elephants Rampage : रानटी हत्तीने वृद्ध महिलेवर हल्ला करून केले गंभीर जखमी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : कुरखेडा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या कोरची तालुक्यातील लेकुरबोडी येथे 21 तारखेच्या सकाळी जंगली हत्तींनी उभ्या पिकांची व घरांची नासधूस केली. यामध्ये एक 80 वर्षीय वृद्ध महिला सनकूबाई कोलूराम नुरूटी ही गंभीररीत्या जखमी झाली असून तिला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मसेली येथून ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भरती केले.
रानटी हत्तींच्या हल्ल्यापुढे नागरिक हतबल
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - नंतर तिला पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रेफर केल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मागील कित्येक दिवसांपासून हे जंगली हत्ती छत्तीसगड मार्गे घेऊन कुरखेडा व गोंदिया जिल्ह्यात दहशत माजवत असल्याचे दिसून आले होते. परंतु आज सकाळी त्यांचा कळप कोरची तालुक्यात दाखल झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.
रानटी हत्तींकडून पिकांची नासधूस
हत्तींकडून पिकांचे मोठे नुकसान - हत्तीच्या कळपामुळे पिकांचे सुद्धा प्रचंड नुकसान झालेले आहेत. हत्तींसोबतच बिबट्या आणि अन्य वन्य प्राण्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील खेडेगावांमध्ये धुमाकूळ माजविणे सुरू केले आहे. वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.