रविंद्रजी ओल्लालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुभारंभ सोहळा संपन्न
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : रविंद्रजी ओल्लालवार भारतीय जनता पार्टी चे (संघटन) जिल्हा महामंत्री तथा माजी अध्यक्ष जि.प.गडचिरोली यांचे जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नुकतेच पार पडला. शुभारंभ करतांना मा.उपेंद्र जी कोठेकर साहेब विदर्भ संघटन महामंत्री, मा.खासदार अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, सहकार महर्षी प्रकाश सा.पोरेड़्डिवार,आमदार कृष्णाजी गजबे,प्रदेश सरचिटणीस एस.टी. मोर्चाचे प्रकाशजी गेडाम जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री प्रशांत जी वाघरे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये,प्रदेश सदस्या रेखाताई डोळस,माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, माजी जि.प.अध्यक्षा योगीता भांडेकर, यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन व शुभारंभ सोहळा संपन्न झाला.
तसेच या प्रसंगी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.