गोंडवाना विद्यापीठात सविधान दिन उत्साहात साजरा...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून मनोगत व्यक्त केले. संविधान हे आजच्या घडीला कसे महत्त्वाचे आहे ते त्यांनी स्पष्ट केले. सर्वांना संविधान दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष स्थानावरून बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, बाबासाहेब भारत देशातील सर्वांचे आहे. त्यांनी संविधान निर्मिती पासून ते आजपर्यंत संविधानामध्ये किती कलमे आहेत आणि ते निर्माण करण्यासाठी किती वेळ लागला आणि ते आपल्याला कसे उपयुक्त आहे हे सांगितले आणि त्यांनीही सगळ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी सर्व संविधानिक अधिकारी, अधिकारी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार डॉ. शिल्पा आठवले, सहाय्यक प्रा. इंग्रजी विभाग यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक डॉ. नंदकिशोर माने सहाय्य प्रा.इतिहास विभाग हे होते.