"माझे संविधान माझा आत्मसन्मान" या नवोपक्रमाने संविधान दिन साजरा : प्रवीण मुंजमकर
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/ देसाईगंज वडसा :
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोडदा येथे २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून अतिशय हर्षोत्सहाने संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना "माझे संविधान माझ्या आत्मसन्मान" या नव उपक्रमाच्या संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळेस विद्यार्थ्यांनी संविधान प्रस्तावनेचे नाट्यीकरण करून सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्यांची जाणीव जागृती करण्यात आली. यानिमित्ताने महिनाभर सतत संविधानाबद्दलचा विशेष वर्ग शाळेमध्ये 'प्रवीण यादव मुंजमकर' सर यांच्या मार्फत सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना संविधानाची ओढ लागून स्वयं अध्ययनाची आवड निर्माण होत आहे. हे सर्व देशाचा भावी नागरिक घडवण्याच्या उद्देशाने अतिशय अभिमानास्पद आहे.
त्यानंतर संविधानाचे प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून तसेच संविधान वाचविण्याकरिता संविधाना संबंधित घोषवाक्य देऊन प्रभात फेरी काढली. संविधान दिनाबद्दल जाणीव जागृती निर्माण करून हा कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोडधा तर्फे अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला. त्यांच्या या उपक्रमास, वी.एन.आय. VNI मीडिया ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन.