फुलोरा अध्यापनात डिजिटल साधनांचा वापर ; प्रवीण मुंजमकर
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली / देसाईगंज (वडसा):
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोडदा येथील शिक्षक प्रवीण यादव मुंजमकार यांनी इयत्ता तिसरी चौथी ला अध्यापन करण्याकरिता भाषा आणि गणिताच्या मूलभूत विकासाकरिता फुलोरा अध्यापन पद्धती व्यवस्थित रित्या राबवत विविध शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ करीत आहेत. यामध्ये शाळेला प्राप्त डिजिटल बोर्डचा वापर करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये गती आणण्याचे काम डिजिटल साधनाच्या वापराने होत आहे. डिजिटल बोर्ड चा वापर करून प्रसंगानुरूप युट्युब तसेच दीक्षा ॲपवरील विविध प्रासंगिक व्हिडिओ दाखवून अध्यापन केल्याने विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असून ज्या ज्या शाळांना डिजिटल साधने प्राप्त झालेली आहेत अशा समस्त शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगती करिता डिजिटल साधनांचा वापर जास्तीत जास्त करून विद्यार्थ्यांना अध्यापन जर केला तर विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तामध्ये नक्कीच वाढ होईल.
विद्यार्थ्यांना अध्ययनात रस येईल आणि अध्ययन कार्य सुलभ होईल.