Vidarbha News India - VNI
सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती कधी सुधारणार?
:- २८१ पैकी ७८ डॉक्टरांची पदे रिक्त
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : नक्षलपीडित, आदिवासीबहुल आणि विपरीत भौगोलिक परिस्थितीमुळे दळणवळणाच्या सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात या परिस्थितीचा सर्वाधिक फटका आरोग्यसेवेला बसत आहे.
काही भागात रुग्णालये आहेत; पण डॉक्टरांची पदे भरलेली नाही, तर कुठे डॉक्टर आहे; पण बारमाही रस्ता, पूल नसल्यामुळे तत्पर सेवेला मुकावे लागते. अजूनही अनेक गावांत रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्यामुळे रुग्णाला कित्येक किमीची पायपीट करत उपचारासाठी आणावे लागते. आरोग्यसेवेची ही हेळसांड अजून किती दिवस सहन करायची, असा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक उपस्थित करत आहेत.
गेल्या ४-५ वर्षांत शासनाच्या प्रयत्नातून शहरी भागात दवाखान्यांच्या इमारती, भौतिक सुविधा व इतर बाबींची पूर्तता करण्यात आली. त्यामुळे शहरी भागातील आरोग्यव्यवस्था बऱ्यापैकी बळकट झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत अनेक बाबतीत सुधारणा करण्यास वाव आहे. दळणवळणाच्या सुविधांवरही येथील आरोग्यसेवा अवलंबून आहे. जिल्ह्यात कोणी डॉक्टर सेवा देण्यास दुसरीकडे डॉक्टरांच्या रिक्त तयार होत नाही. त्यांच्याकडुन पदांचाही फटका बसत आहे. शासकीय सेवेच्या नियमांची गडचिरोली जिल्ह्यात वर्ग १ व २ च्या अवहेलना होत असताना कोणतीही डॉक्टरांची तब्बल ७८ पदे रिक्त कारवाई होत नाही. त्यामुळे अनेक असल्याने याचा परिणाम रुग्णसेवेवर डॉक्टर या जिल्ह्यात सेवा देण्यास होत आहे. बदली होऊनही या हुलकावणी देतात.
जिल्हा रुग्णालयांकडे कर भरण्यासाठीही पैसे नाही
गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा महिला व बालरुग्णालयाकडे नगरपरिषद प्रशासनाला द्यावयाच्या विविध करापोटी जवळपास सव्वा कोटी रुपये थकीत आहेत. तसेच महिला रुग्णालयाकडे ३५ लाखांची कर थकबाकी आहे. सदर कराचा भरणा करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने वारंवार कागदी घोडे नाचवावे लागत आहेत.
१.८८ कोटींचे वीज बिल थकीत
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे वीज सेवेपोटी महावितरणने पाठविलेले एक कोटी ८८ लाख रुपयांचे वीज बिल प्रलंबित आहे. याबाबतची माहिती आरोग्य संचालक व आयुक्त स्तरापर्यंत पोहोचली आहे, मात्र अजूनही वीज बिल भरण्यासाठी निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासन प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवेच्या बाबतीत अशी हेळसांड होऊ न देता शासनाने सर्व अडचणी दूर कराव्यात, अशी गडचिरोलीकरांची अपेक्षा आहे.
...अशी आहेत रिक्त पदांची स्थिती
जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण असे मिळून शहरी भागात १४ शासकीय रुग्णालये आहेत. यामध्ये वर्ग १ च्या डॉक्टरांची २० व वर्ग २ च्या डॉक्टरांची ८ पदे रिक्त आहेत. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांचीही २०० वर पदे रिक्त आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वर्ग १ च्या डॉक्टरांची ७५ पदे मंजूर आहेत. यापैकी ४ रिक्त आहेत. कार्यरत डॉक्टरांमध्ये ४८ नियमित, ११ कवाटी, तर आठ बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टर आहेत. याशिवाय बीएएमएस ४ डॉक्टरांची नियुक्ती गट अ वैद्यकीय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गट बच्या वैद्यकीय अधिकायांची एकूण ७५ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ २१ पदे भरण्यात आली असून, खल ४६ पदे रिक्त आहेत. याशिवाय येत्या काही दिवसात कार्यरत २ डॉक्टर पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी जाणार असल्याने पुन्हा डॉक्टरांची कमतरता जाणवणार आहे.