दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; दरमहा 69,000 पगार, भरती प्रक्रियेला सुरुवात - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; दरमहा 69,000 पगार, भरती प्रक्रियेला सुरुवात



Vidarbha News India - VNI

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; दरमहा 69,000 पगार, भरती प्रक्रियेला सुरुवात

विदर्भ न्यूज इंडिया 

ITBP Recruitment 2022

तुम्ही दहावी पास ( 10 th Pass ) असाल आणि सरकारी नोकरीच्या ( Govt.Job ) शोधात असाल, तर ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. दहावी पास उमेदवारांसाठी ITBP मध्ये नोकरीची संधी आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात (ITBP) हवालदार ( Constable ) पदांसाठी भरती प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करा. इच्छुक उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठीची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.

ITBP Constable Recruitment 2022 : रिक्त पदांचा तपशील

  • एकूण रिक्त पदं : 287
  • कॉन्स्टेबल टेलर : 18 पदं
  • कॉन्स्टेबल गार्डनर : 16 पदं
  • कॉन्स्टेबल मोची : 31 पदं
  • कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी 78 : पदं
  • कॉन्स्टेबल वॉशरमन : 89 पदं
  • कॉन्स्टेबल बार्बर : 55 पदं

ITBP Constable Recruitment 2022 : शैश्रणिक पात्रता

इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात (ITBP) हवालदार (Constable) पदांसाठी 287 जागांवर भरती करण्यात येणार आहे. कांस्टेबल टेलर, गार्डनर आणि कॉबलर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असावं. तसेच संबंधित विभागात आयटीआय डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. तर कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी, वॉशरमॅन आणि बार्बर पदासाठी अर्झ करणाऱ्या उमेदवाराचे दहावी शिक्षण पूर्ण झालेले असावे.

ITBP Constable Recruitment 2022 : वयोमर्यादा

कॉन्स्टेबल , टेलर, गार्डनर आणि कॉबलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 से 23 वर्ष या दरम्यान असावं. तर कॉन्स्टेबल, सफाई कर्मचारी आणि बार्बर पदासाठी उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्ष या दरम्यान असावं.

ITBP Constable Recruitment 2022 : पगार

या पदांवर निवड झाल्यानंतर, उमेदवारांना स्तर तीननुसार वेतन मिळेल. सातव्या वेतन आयोगानुसार, उमेदवाराला 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. याबाबत अधिक तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना वाचावी.

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. 

त्यामुळेच ''विदर्भ न्यूज इंडिया'' VNI मीडिया ग्रुप ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

Share News

copylock

Post Top Ad

-->