Vidarbha News India - VNI
गडचिरोली : घरफोडी करणारे ४ अट्टल चोरट्यांना अटक
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : शहरातील विविध ठिकाणी घरफोडी करुन मूल्यवान दागिन्यांची चोरी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुलाम अहमद मेहमूद आलम शहा (वय ३२), शाहिद अली हमीद अली शहा (वय १९), करीम बकसुला शहा (वय २०) व उसलम अजीमउल्ला शहा (वय १९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक केलेले सर्वजण आरमोरी येथे वास्तव्य करुन घरफोडी करीत होते. या चौघांनी १४ ऑक्टोबरला गडचिरोली शहरातील रेड्डी गोडाऊन चौकातील विनायक कुंभारे यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर ३ ऑक्टोबरला नेहरु वॉर्डातील प्रशांत सरकार यांच्या घरातून ४९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले होते.
तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या सुचनेवरून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केले होते. त्यांच्याकडून ३ महागडे मोबाईल, सोन्याचे ३ टॉप्स, चांदीची चाळ, ४ बेबी चाळ, ५ बेबी वारे, एक नथ, चांदीच्या ४ पायपट्ट्या, चांदीचे ५ जोडवे असा ऐवज जप्त केला. हवालदार विलास उराडे, पोलीस नाईक सचिन आडे, धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, ठोंबरे यांनी ही कारवाई केली.