कूनघाडा येथे भव्य रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण : खासदार अशोक नेते यांचे हस्ते संपन्न
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुणघाडा येथे जय गलबल्या बापू स्पोर्टीग क्लब कुणघाडाच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रात्रकालीन अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे बक्षीस वितरण गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचे हस्ते संपन्न झाले. या रात्रकालीन अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे प्रथम बक्षीस एक्केविस हजार रुपये द्वितीय पारितोषिक तेरा हजार रुपये व तृतीय बक्षीस सात हजार रुपये होते यावेळी यावेळी विजेता प्रथम द्वितीय व तृतीय संगास पारितोषिक वितरण खासदार अशोक नेते यांचे शुभ हस्ते वाटप करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे माजी पंचायत समिती उपसभापती भाजप नेते आनंद भांडेकर गडचिरोली चिमूर लोकसभा सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी , नगरसेवक आशिष पिपरे, भाजप नेते उमेश कुकडे ,रमेश कोठारे , व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांना खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन केले.
येथे उपस्थित शेकडो युवा जणांना मार्गदर्शन करतांना खासदार अशोक नेते यांनी सांगितले युवकांनी हरल्यास खचून जाऊ नये आज हरले तर उद्या नक्कीच जिंकता येईल ही भावना जोपासून एकमेकांना साथ देणारी संकल्पना बाळगावी व सांघिक भावना जोपासून खिलाडी वृत्तीने प्रामाणिकपणे खेळ खेळावे व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा युवकांनी पुढाकार घ्यावा परंतु कुनघाडा भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या महसूल विभागाचा अधिकाऱ्यांना निलंबित केल्या शिवाय गप्प बसणार नाही असे प्रतिपादन केले यावेळी येथील आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वासेकर यांनी केले यावेळी या भव्य बक्षीस वितरण सोहळ्यात या पंचक्रोशीतील शेकडो युवक व येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रामुख्याने
जय गलबल्या बापू स्पोरटिंग क्लब अध्यक्ष राहुल रक्षणवार , उपाध्यक्ष गोलू मडावी ,सचिव गणेश पिपरे , क्रीडा प्रमुख साहिल वडेट्टीवार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.