Vidarbha News India - VNI
कारची एकच धडक, ट्रॅक्टरचे झाले 3 तुकडे, 2 चिमुरडे थोडक्यात बचावले, पाहा व्हिडीओ...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्ह्यामध्ये कार आणि ट्रॅक्टरचा विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे अक्षरश: 3 तुकडे झाले. या भयावह अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरची मुख्यालयापासून अंदाजे 15 ते 16 किमी अंतरावर आलेवाडा परिसरात हा अपघात झाला. मुरारी कुंजाम राहणार बेतकाठी येथील शेतकरी स्वतःच्या मालकीचे धान्य भरून येत होता. त्यावेळी अचानक समोरून भरधाव वेगाने येणारा कारने जोराची धडक दिली.
भरधाव कारच्या धडकेनंतर ट्रॅक्टरचे अक्षरश: 3 तुकडे झाले. इंजिन एका बाजूला तर मधल्या भागाचे दोन तुकडे झाले. या ट्रॅक्टरमध्ये 5 लोक बसून होते. यामध्ये 2 चिमुकल्यांच्या सुद्धा समावेश होता.
परंतु, सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. ट्रॅक्टरमध्ये असलेल्या राकेश नैताम बेतकाठी यांना छातीला आणि पायामध्ये दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे.
#गडचिरोली कारच्या धडकेमध्ये ट्रॅक्टर चे तुकडे... #Gadchiroli #Vidarbha@MediaVNI
— Vidarbha News India (@MediaVNI) November 19, 2022
कारची एकच धडक, ट्रॅक्टरचे झाले 3 तुकडे, 2 चिमुरडे थोडक्यात बचावले, पाहा व्हिडीओ... pic.twitter.com/0aefZeZ5uR