सामूहिक वनहक्क समितीची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
- टाटा सामाजिक विज्ञान केंद्र मुंबई चा स्तुत्य उपक्रम
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर / ता. प्रतिनिधी - सावली : बंडू मेश्राम
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वन हक्काचे मान्यता अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारित नियम 2012 नुसार कलम (5) व कलम (3) (1) नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना "निरंतर वापर करण्यासाठी पारंपारिक रित्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वन संरक्षण, पुनर्निर्मान, संवर्धन, किंवा व्यवस्थापन करण्याचा हक्क" प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन निर्णय 6 जुलै 2017 च्या अनुषंगाने सामूहिक वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. सावली तालुक्यात एकूण बारा गावांना वनहक्क प्राप्त झाला असून संपूर्ण महाराष्ट्रात केवळ सावली तालुक्यात तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनात सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यानुसार वनहक्क समितीचे अधिकार व कर्तव्य काय आहेत, गावाच्या विकासाकरीता कामाचा आराखडा कसा तयार करावा यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पंचायत समिती सावली येथे एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.
त्यावेळी निकुरे साहेब भूमी उपअधीक्षक भूमीअभिलेख सावली, परसावर साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती सावली, गीतांजय साहू टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई, त्याचप्रमाणे स्नेहा ददगल, वैष्णवी चौधरी, रजनी घोगरे तालुका व्यवस्थापक, राहुल बनसोडे, अमोल कुकडे, जगदीश डोळसकर, प्रवेश सुटे, शुभम वनवे, सुकेशनी बागडे, नितीन ठाकरे, मनरेगाचे PTO भोयर,आभारे, राऊत, सर्व ग्रामसेवक, वनविभागाचे अधिकारी, वनरक्षक, कृषी विभागाचे अधिकारी व सर्व वनहक्क व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
संचालन PTO पीटीओ भोयर यांनी तर आभार प्रदर्शन कुकडे यांनी केले.