चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वाघांचा मृत्यू - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वाघांचा मृत्यू

Vidarbha News India - VNI 

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वाघांचा मृत्यू

विदर्भ न्यूज इंडिया

चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याच्या बफरझोनमधील शिवनी व मोहरली वनपरिक्षेत्रात एका वाघाचा व एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी गस्त घालत असताना मृतावस्थेत वाघ व बछडा आढळून आले. ताडोबाच्या बफर झोनमधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू सुमारे २०-२५ दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविला आहे.

मृतावस्थेतील वाघ खूप दिवसांपासून त्या ठिकाणी पडून होता. वनरक्षक आणि कर्मचाऱ्यांना तो ३० नोव्हेंबर रोजी आढळून आला. वरिष्ठांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. बुधवारी (दि.३०) सांयकाळी शवविच्छेदन होऊ शकले नाही. गुरूवारी वाघाचे घटनास्थळीच दहन करण्यात आले. दुसरी घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहरली वनपरिक्षेत्रातील आगर्झरी येथे आज सकाळी उघडकीस आली. पट्टेदार वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. तो अंदाजे पाच ते सहा महिन्याचा आहे. अन्य वाघाच्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

सहाय्यक वनसंरक्षक बापू येडे, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणचे प्रतिनिधी बंडू धोत्रे अध्यक्ष प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव याचे प्रतिनिधी मुकेश भांडवलकर, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुंदन कोडसेलावर यांची उपस्थिती होती. या वाघाच्या बाच्छड्याला ताब्यात घेऊन चंद्रपूर येथील वन विभागाच्या ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटर येथे आणण्यात आले. डॉ. कुंदन कोडसेलावार, डॉक्टर संजय बावणे यांनी त्याच्यावर शवविच्छेदन करून वैद्यकीय तपासणी केली. यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरपाम यांचे उपस्थितीत वाघ व बछड्याचे दहन करण्यात आले.

Share News

copylock

Post Top Ad

-->