Vidarbha News India - VNI
ग्रामसेवक गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू : आ. डॉ. देवरावजी होळी
चामोर्शी पंचायत समिती येथे ग्रामसेवकांची घेतली बैठक
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : ज्याप्रमाणे राज्याचे मुख्य सचिव हे संपूर्ण राज्याच्या विकासाच्या संदर्भात सर्व विभागांशी समन्वय साधून कामकाज पार पाडत असतात त्याचप्रमाणे ग्रामसेवक हा राज्याच्या मुख्य सचिवाप्रमाणे गावाचा मुख्यसचिव असून तो गाव विकासाचा केंद्रबिंदू आहे. त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी सातत्याने काम केले पाहिजे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी पंचायत समिती येथील ग्रामसेवकांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना केले. यावेळी बैठकीला संवर्ग विकास अधिकारी श्री पाटील साहेब प्रामुख्यानं उपस्थित होते.
ग्रामसेवकांनी "आमचा गाव आमचा विकास " ह्यातून गाव विकासाच्या आराखड्याच्या संदर्भात २ महिन्यातून किमान एकदा सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करावे. गाव विकासाच्या आराखड्याची अंमलबजावणी केल्यास गाव विकास होण्यास मदत होईल.
"आमचा गाव आमचा विकास" "आत्मनिर्भर शेतकरी" "आत्मनिर्भर भारत" हे लक्ष ठेवून ग्रामसेवकांनी काम करावे असे आवाहन त्यांनी या बैठकीला उपस्थित ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना केले.