PMFBY रब्बी हंगाम मध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा : कृषी कार्यालय चामोर्शी
विदर्भ न्यूज इंडिया
(गडचिरोली ) चामोर्शी : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२२ मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून पीकविमा काढण्याकरिता भारतीय कृषी पिक विमा कंपनीचे प्रचार प्रसिद्धी वाहनाचे उद्घाटन मा. तालुका कृषी अधिकारी श्रीमती एस.एस. परदेशी यांचे हस्ते (दि. ५) रोजी करण्यात आले आणि वाहनाला हिरवी झेंडी दर्शवून तालुका कृषी कार्यालयातून मार्गस्थ करण्यात आले.
यावेळी कृषी पर्यवेक्षक, गजभिये सर, कृषी सहाय्यक , उडान सर, श्री. बोधे सर, यचवाड सर, मोरोलीयो सर, कवास सर, सोमणकर सर, डोंगरे सर, उत्तरवार सर, कोहचाळे मँडम, निमगडे मँडम, तालुका प्रतिनिधी संतोष नायगमकर, इत्यादी उपस्थित होते.
प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२२ मध्ये जास्तीत जास्त शेतक-यांनी आपल्या पिकाचा विमा काढून योजनेचा फायदा घ्यावा असे आव्हाहन तालुका कृषी अधिकारी श्रीमती एस.एस. परदेशी यांचेकडून करण्यात आले.