स्वतंत्र कामगार संघटने तर्फे विधानभवनावर विविध मागण्यासह आंदोलन करण्याचे आयोजन
- श्रमिक कामगाराच्या विविध चर्चा.
- पदोन्नती मधील आरक्षण संदर्भात सद्यस्थिती बाबत चर्चा.
- कंत्राटी कामगाराना नियमित करण्याबाबत चर्चा.
: या वरील विषयावर बैठक चर्चा सपन्न...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : स्वतंत्र कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. ज्ञानेश्वर खैरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य घटक पक्ष मा. गणेश उके, इलेक्ट्रिकल वर्कर्स असोसिएशनचे श्री.शैलेश वाशिमकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर विधानसभेवर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या संदर्भात बैठक झाली. स्वतंत्र कामगार युनियन जिल्हा शाखा गडचिरोली, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, स्वतंत्र विद्युत कर्मचारी संघटना कंत्राटी कामगार अधिकारी युनियन, गवंडी बांधकाम कामगार संघटना, ग्राम सेवक संघटना, मागसवर्गीय दूरसंचार कर्मचारी संघटना इ. मा. नरेंद्र वाडे, मा. विवेक खोब्रागडे, श्री. संजीव बोरकर, श्री. सुधीर चौधरी, श्री. देवराव दुधबडे, मा. देशोपाल शेंडे, मा. नितीन गौरखेडे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मजूर उपस्थित होते.