दि. ०८ जानेवारी २०२३
Vidarbha News India - VNI
शासकीय आश्रम शाळा मुरुमगांव येथे दिशा कार्यक्रमांतर्गत भव्य आरोग्य शिबीर
◆ १३९ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/ धानोरा : नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या एज्युकेट गडचिरोली फेलोशिप च्या माध्यमातून गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील १० शासकीय आश्रम शाळांमध्ये 'दिशा' आरोग्य व स्वच्छता शिक्षण कार्यक्रम मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. 'दिशा' आरोग्य व स्वच्छता शिक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पिरामल फाउंडेशन व आरोग्य विभाग गडचिरोली यांच्या मार्फत दिनांक ०७ जानेवारी २०२३ रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मुरुमगाव येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिरामध्ये ब्लड ग्रुप, सिकलसेल, मलेरिया, बी.एम.आय., एच. बी., डोळे, दात आदी तपासण्यासह उंची, वजन घेण्यात आले. विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली सोबतच योग्य सल्ला व औषधोपचार करण्यात आले. या शिबिराचे लाभ शाळेतील वर्ग सातवी ते दहावीच्या एकूण १३९ विद्यार्थ्यांनी घेतला. गरज असलेल्या विद्यार्थांना ग्रामीण रुग्णालय/सामान्य रुग्णालय येथे रेफर करण्यात आले.
यावेळी सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रंगारी, वैद्यकिय अधिकारी, आश्रमशाळा पथक (सर्व), सामान्य रुग्णालय डॉ. उमेश सिडाम, प्रा.आ.कें.मुरुमगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषाली भोपे, डॉ. राहुल बन्सोड, तंत्रज्ञ प्रशांत गोतमारे, गोपी साखरकर, मनीषा पद्दा, कीर्ती चिताळ, आर.के.एस.के. च्या सल्लागार बबिता मेश्राम, पिरामल फाउंडेशनचे राहुल बारचे, मुख्याध्यापिका मेश्राम, गडचिरोली एज्युकेट फेलो सुरज तुपट, अधीक्षक संभरकर, अधिक्षिका शिंदे, पुरी, हर्षे, पेदापल्ली, भोयर, माहुरकर, खेवले आदींसह शाळेतली सर्व शिक्षक व स्थानिक आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.