दि. ०९ जानेवारी २०२३
गोंडवाना विद्यापीठात रस्साखेच स्पर्धेचे उद्घाटन...
★ जो खेळेल तो आयुष्याची लढाई सुद्धा जिंकेल ; कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : संघभावानेमुळे खेळल्यामुळे सांघिक भावना वाढीस लागते. खेळात जिंकणं किंवा हरणं हा विषय नसतो. टीम मध्ये कसं काम करायचं हे महत्त्वाचं असतं कारण पुढे जाऊन तुम्हाला नोकरी करायची आहे, अशा वेळेला टीम भावनेने खेळणं महत्त्वाचं असतं हे कौशल्य खेळातून सध्य होणार असतं. जो खेळल तो आयुष्याची लढाई सुद्धा जिंकेल असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी कालच्या क्रीडा कार्यक्रमात केले. गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागा तर्फे आतंर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धे अंतर्गत आज रस्साखेच स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे, डॉ.शैलैंद्र गरिपुंजे उपस्थित होते.
खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते.खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. खेळात आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते व मनाला उत्साह मिळतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते.असे मार्गदर्शन संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग डॉ. अनिता लोखंडे यांनी केले. गोंडवाना
विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांच्या मुला -मुलांची संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.