दि. ०९ जानेवारी २०२३
खा. अशोक नेते यांची मूकबधिर विद्यालय नागपूर येथे सदिच्छा भेट याप्रसंगी सत्कार
खासदार अशोक नेते यांची मुकबधिर विद्यालय हुडकेश्वर रोड, पिंपळा फाटा नागपूर येथे सदिच्छा भेट
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : खासदार अशोक नेते यांनी श्री.संत गाडगे महाराज बहुउद्देशीय विकास मंडळ, नागपूर व महाराष्ट्र राज्य धोबी, परिट,वरठी, सर्व भाषिक समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. संत गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने भव्य रोगनिदान आरोग्य तपासणी शिबीर व स्नेहसंमेलन या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन खासदार अशोक नेते यांनी उपस्थिती दर्शविल्याने याप्रसंगी मुकबधिर संस्थेचे अध्यक्ष डि.डि.सोनटक्के यांनी यावेळी शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, देऊन स्वागत केले.
याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी मुकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यां सोबत संवाद साधला. त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या मुकबधिर विद्यालयाच्या मुला मुलींची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, ईतर सोयी सुविधा यांची पाहणी केली.
मुकबधिर विद्यार्थ्यांनी बनवलेले टाकावूपासून टिकाऊ वस्तू,सौंदर्याच्या बनविलेल्या वस्तूची सुध्दा स्तुती याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केली.
याप्रसंगी खासदार अशोक नेते, संस्थेचे अध्यक्ष डी.डी.सोनटक्के जी, विद्यालयाचे शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, मुकबधिर विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.