"हाऊ इज द जोश.!" पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका दिवसात उभारले पोलीस मदत केंद्र - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

"हाऊ इज द जोश.!" पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका दिवसात उभारले पोलीस मदत केंद्र

दि. ०५ जानेवारी २०२३

Vidarbha News India - VNI

"हाऊ इज द जोश.!" पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका दिवसात उभारले पोलीस मदत केंद्र

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : पोलिसांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत छत्तीसगड सीमेवरील भामरागड पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम मन्नेराजाराम येथे स्थानिकांच्या मदतीने एका दिवसात पोलीस मदत केंद्र उभे केले.

या कामात एक हजार जणांनी हातभार लावला. पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून छत्तीसगड सीमेवरून जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे.

दक्षिण गडचिरोली परिसर नक्षल कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील समजला जातो. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस मदत केंद्रांची गरज आहे. त्यादृष्टीने गडचिरोली पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मन्नेराजाराम येथे एका दिवसात पोलीस मदत केंद्राची स्थापना केली. बुधवारी एक हजार लोकांच्या मदतीने एका दिवसात हे केंद्र उभे केले. भामरागड पोलीस उपविभागांतर्गत येणारा हा परिसर छत्तीसगड सीमेवर असून येथून मोठ्या प्रमाणात नक्षल्यांची हालचाल असते. या पोलीस मदत केंद्रामुळे नक्षली कारवायांवर अंकुश ठेवण्यास मोठी मदत होणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वायफाय सुविधेसह सुसज्ज असलेल्या या केंद्रात २० पोर्टा कॅबिन, मॅकवॉल, सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ३ अधिकारी, ४६ अमलदार, एसआरपीफचे २ अधिकारी व ५० अमलदार तसेच सीआरपीएफचे एक असिस्टंट कमांडंट, ४ अधिकारी व ६० अमलदार तैनात करण्यात आले आहेत. यावेळी घेतलेल्या जनजागरण मेळाव्यात गावातील नागरिकांना विविध साहित्यांचे वाटपदेखील करण्यात आले. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक लोकेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफच्या नवव्या बटालियनचे कमांडंट बाळापूरकर, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, आदी अधिकारी उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->