जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी पुढाकार घ्यावा : खा. अशोकजी नेते
भव्य निःशुल्क आरोग्य शिबिर संपन्न..!
शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद..!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील मौजा आंधळी ( फाटा) येथे बहुजन हिताय शिक्षण संस्था कुरखेडा चे संस्थापक दिवंगत श्री सुखदेव सदाशिव मेश्राम यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्त आशा हॉस्पिटल नागपूर चे सहकार्याने भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मधुकरजी कुकडे माजी खासदार, नाना भाऊ नाकाडे माजी सभापती जि.प., चांगदेव भाऊ फाये युवा मोर्चाचे जिलहाध्यक्ष ,भैय्या लाल राऊत, जगदीश बोरकर , उज्वला ताई राय सिडाम सरपंच आंधळी सुमनताई कुंभरे सरपंच चिखली सुप्रियाताई तुलावी सरपंच गुरनोली,दिनकरजी कुमोटी सरपंच बेलगाव,उपस्थीत होते.
या आयोजित आरोग्य शिबिरात या भागातील शेकडो रूग्ण नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांना खासदार जी भाऊ नेते यांनी मार्गदर्शन केले.
या आरोग्य शिबिरात जनरल चेक अप , पोटाचे विकार, स्पाइन सर्जरी, हाडाचे विकार ,लघवी विकार ,हार्ट विकार ,किडनी स्टोन
अंजियोप्लास्ती, व अनेक विकारावर उपचार करण्यात आले व प्रामुख्याने आलेल्या सर्व रुग्णांचे बी ,पी,शुगर , इसिजी, मोफत करण्यात आले,व शस्त्रक्रिया करिता निवड करण्यात आलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन बहुजन हिताय शिक्षण संस्था चे सचिव कृपाल मेश्राम यांच्या मार्गदर्शन खाली मुख्याध्यापक आंवान हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज चे प्राध्यापकवृंद आंधळी फाटा येथील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी यशस्वी झाला.