दि. २३ जानेवारी २०२३
विद्यार्थांनी रंगारंग कार्यक्रम सादर करूण उपस्थितांची जिंकली मने...
विदर्भ न्यूज इंडिया
ता. प्रतिनिधी चामोर्शी
घोट : बहुउद्देशीय समाज विकास संस्था घोट द्वारा संचालित नवोदय मराठी उच्च प्राथमिक तथा हायस्कूल घोट नवोदय प्रायमरी कॉन्व्हेट स्कूल घोट यांचे वतीने १९ वे निलस्पंदन महोत्सव उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोटच्या सरपंच रूपाली दुधबावरे तर उद्घाटक म्हणून जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य नागेश्वर राव हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून घोट चे पोलीस पाटील हरीदास चलाख, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेर्डीवार,उपप्राचार्य राजन गजभिये, प्रा - सि. के. कांबळे, परमपूज्य महात्मा गांधी शाळेचे प्राचार्य मनोज नागोसे, प्रभारी केंद्रप्रमुख भगवान मेश्राम, लोकमंगल संस्थेचे उमाजी कुद्रपवार, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश दूधबावरे, नागपूर येथील डब्लु सी.एल. सहायक प्रबंधक राहुल बागडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोवर्धन सामाजिक कार्यकर्त्या शीलाताई वैरागडे,मुख्याध्यापिका विजयश्री अगडे, प्रियंका रोंढे , हेमंत उपाध्ये,पांडुरंग कांबळे, शिवाजी गर्जेसर,किसन सोनटक्के,अशोक मेहता,बुरांडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शक जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य म्हणाले गडचिरोली जिल्ह्याच्या घोट येथे ग्रामीण भागात शिक्षणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध असल्याने समाजात शिक्षणाप्रती चांगली जागृती असल्याने समाजाचा विकासासाठी शिक्षणाचे महत्त्वाचे योगदान असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सर्व स्तरात आपले नावलौकिक करावे असे प्रतिपादन जवाहर नवोदय प्राचार्य नागेश्वरराव यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी के कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन सुनील गोवर्धन यांनी केले तर आभार किशोर ढोरे यांना मानले यावेळी शाळेतून शिकुन गेलेल्या शासकीय नोकरीत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थांचा श्याल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रम सादर करूण उपस्थित नागरीकांचे मने जिंकली कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी व सर्व पालकांनी सहकार्य केले.