शिक्षकांच्या नियमीत वेतनासाठी शिक्षण मंत्र्यांना म.रा.प्रा.शिक्षक संघटनेकडून निवेदन - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

शिक्षकांच्या नियमीत वेतनासाठी शिक्षण मंत्र्यांना म.रा.प्रा.शिक्षक संघटनेकडून निवेदन

दि. २३ जानेवारी २०२३
Vidarbha News India - VNI
शिक्षकांच्या नियमीत वेतनासाठी शिक्षण मंत्र्यांना  म.रा.प्रा.शिक्षक संघटनेकडून निवेदन                    
- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी; वेतनाचा प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा              
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे दिवाळीपासुन मासिक वेतन आर्थिक तरतुद अपुरी येत असल्याने अनियमित होत आहेत. त्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. वेळोवेळी अपुरा निधी येत असल्याने जिल्हा परिषद दर महिण्याला दोन ते तीन तालुक्याचे वेतन थांबवत आहे. जिल्ह्यातीलसर्वच शिक्षकांचे वेतन एकाचवेळी होत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. अनियमित वेतनामुळे शिक्षकांना ज्यादा व्याजाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पुरेशी आर्थिक तरतुद उपलब्ध उपलब्ध होत नसल्याने सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या थकीत रकमा, अर्जित रजा,वैद्यकीय परिपुर्तीचे देयके प्रलंबित आहेत. या सर्व प्रलंबित देयकांसाठी व नियमित वेतनासाठी मागणी प्रमाणे निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्यपदाधिकारी यांनी शालेय शिक्षणमंञी मा.श्री दिपक केसरकर यांची दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केलेली आहे. वेतनाचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. हा प्रश्न न सुटल्यास महाराष्टृ राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष मा.श्री राजाराम वरुटे, राज्यकोषाध्यक्ष मा.श्री संभाजी बापट,श्री पांडु केने यासह आदी राज्यपदाधिकारी यांनी दिलेला आहे. असे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर,आशिष धाञक,राजेश चिल्लमवार,शिलाताई सोमनकर,सुरेश पालवे,सुरेश वासलवार,लोमेश उंदिरवाडे,अशोक राॅयसिडाम,अशिम बिश्वास,निलकंठ निकुरे,देवनाथ बोबाटे,संजय कोंकमूट्टीवार यांनी प्रसिद्धीस दिलेले माहिती आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->