गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रायसेफ केंद्राचे उद्घाटन... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रायसेफ केंद्राचे उद्घाटन...

दि. ०३ जानेवारी २०२३ 
Vidarbha News India - VNI
गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रायसेफ केंद्राचे उद्घाटन
गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रायसेफ केंद्रामुळे  युवकांमध्ये असलेल्या नवउदयोजकतेला चालना ; प्रधान सचिव मनिषा वर्मा
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ परीक्षेत्रात मुबलक प्रमाणात वनउपज व वनौषधी आढळतात. जे स्थानिक आदिवासी समुदायाच्या उपजिविकेचे मुख्य स्त्रोत आहे.  हीच बाब लक्षात घेऊन गोंडवाना विद्यापीठाने वनउपज क्षेत्रातून अधिकाधिक स्टार्टअप कसे तयार होतील. यासाठी प्रयत्न केले. गोंडवाना विद्यापीठा च्या नवसंशोधन केंद्रामार्फत सुरू असलेले व्यवसाय स्तुत्य आहे. त्यामुळे युवकांमध्ये उद्योजकतेला चालना मिळेल असे प्रतिपादन राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता  विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी केले.  
गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रायसेफ केंद्राचे उदघाटन नुकतेच पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी संजय मीणा, गोडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र -कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन,  विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र देव, मानव अधिष्ठता डॉ. चंद्रमौली, नव संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार आणि इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 
नवउद्योजकतेसाठी केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतांना त्यांच्या विभागा ची चमू त्या विद्यापीठास भेट देण्यास पाठवणार जेणेकरून गोंडवाना विद्यापीठाने नवोद्योजक निर्मितीबाबत केलेल्या प्रगतीचा प्रसार राज्यातील इतर विद्यापीठाच्या नवसंशोधन केंद्रास मार्गदर्शक ठरेल असेही त्या म्हणाल्या.
स्थानिक आदिवासी समुदायाचे पारंपारिक ज्ञानावर आधारित वनौषधी व्दारा उपचार करणाऱ्या वैदूंना आर्थिक लाभ देण्याचे व्यवस्था करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 
यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या इतरही विभागांना भेट देत विद्यापीठात सुरु असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली.
नवसंशोधन केंद्र ,ट्रायसेफच्या विविध क्षेत्रातील नवउद्योजकांशी अतिशय उत्साहाने वार्तालाप करून त्यांच्या  उत्पादनांची त्यांनी माहिती घेतली.
नव संशोधन केंद्राची माहिती डॉ. मनिष उत्तरवार  तर विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राची माहिती मुख्य  कार्यक्रम अधिकारी व प्रमुख आशिस घराई यांनी दिली.

Share News

copylock

Post Top Ad

-->