नसती सावित्री तर......
विदर्भ न्यूज इंडिया
( कविता ) : -
नसती सावित्री तर
आज कुठे असत्या मुली?
जुन्या चालीरीतींना स्विकारुन
नुसत्या फुकत असत्या चुली
सहन केला त्रास तीने
समाजकांचा वीरोधकांचा
सनातनाना न जुमानता
वसा जपला शिक्षणाचा
तीव्र वीरोध असुनही
एकनिष्ठता तीच्या मनात
जिवनमान आपलं उंचावण्यासाठी
संघर्ष केला तीने त्या काळात
सावित्रीच्या लेकींनो संदेश
प्रियंकाचा तुम्ही ऐका
घराघरात हवी सावित्री
व्यर्थ वेळ वाया घालवू नका....
कवयित्री : प्रियंका वाकडे/शेंडे
(गडचिरोली)
मो. ९४०४९५९५२३