पत्रकारांना १० लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण योजनेचा शुभारंभ - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

पत्रकारांना १० लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण योजनेचा शुभारंभ

दि. ३१ जानेवारी २०२३

पत्रकारांना १० लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण योजनेचा शुभारंभ 
Vidarbha News India - VNI
चंद्रपूर ; गडचिरोली डिजिटल मीडिया असोसिएशन पुढाकारातून अपघात विमा पॉलिसीचा शुभारंभ...

विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर : सर्वसामान्यांना त्यांच्या परिसरातील अचूक बातमी मिळावी, म्हणून पत्रकार हा आपल्या आरोग्याची पर्वा न करता दिवसरात्र मेहनत करतो अन् बातमी तयार करतो. त्याकरिता त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचीच दखल घेत राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर पत्रकारिता व पत्रकारांसाठी लढा देणाऱ्या अनेक संघटना आहेत या संघटनांच्या प्रेरणेतून गडचिरोली ग्रामसेवक भवन येथे पार पडलेल्या महाराष्ट्र पत्रकार दिनाचे औचित्य साधत विमा पॉलिसीचा शुभारंभ करण्यात आला. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील डिजिटल मीडियात कार्यरत असलेल्या एकूण १७ लोकांना अपघात विमा पॉलिसी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या अपघात पॉलिसी अंतर्गत पत्रकारांना १० लाखांचे विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. पत्रकारदिनी  चंद्रपूर/गडचिरोली डिजिटल मीडिया असोसिएशने पत्रकारांना दिलेली ही अनोखी भेट आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर गडचिरोली जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार रजुभाऊ बिट्टूरवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार दिनेश भाऊ एकोनकर,राजुभाऊ कुकडे, नरेश निकुरे,राजेश अनुपजी यादव, विठ्ठल आवळे, राजेश नायडू, उपस्थित होते. तत्पूर्वी, डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर येथे कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.  जितेंद्र चोरडिया यांनी पत्रकारितेवर प्रकाश टाकून पत्रकारितेबरोबरच पर्यायी व्यवसाय या क्षेत्रातील व्यक्तींनी डिजिटल मीडिया हा प्रभावी माध्यम असून झटपट वृत्त पोहोचविणारा व्यासपीठ म्हणून लोकांनी डिजिटल मीडियाला प्राधान्य दिलेले आहे तेव्हा या क्षेत्रात युवा वर्गाने महिला वर्गांनी सुद्धा पुढे येऊन कार्य करावे, या क्षेत्रात करिअर करावे, असेही ते म्हणाले.
जेष्ठ पत्रकार राजू भाऊ बिट्टूरवार यांनी सुरुवातीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून आपले अनुभव कथन केले. चंद्रपूर गडचिरोली डिजिटल मीडिया असोसिएशन या संघटनेचे उद्देश अतिशय चांगले असून, प्रत्येक डिजिटल मीडिया कार्यरत असलेल्या पत्रकारांनीअशा संघटनेसोबत असावे, अशी अपेक्षाही  व्यक्त केली. दरम्यान, कार्यक्रमात संघटनेचे सदस्यत्व असलेल्या पत्रकारांना (अपघात विमा Policy) वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकेत सचिन जीवतोडे यांनी डिजिटल मीडिया असोसिएशन, संघटनेचे उद्देश व यापूर्वी आणि यापुढे राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. संचालन निलेश सातपुते यांनी केले. आभार खोमदेव तुम्मेवार यांनी मानले. यशस्वितेसाठी मोरेश्वर उधोजवार, आशिष रौंच, मुक्तेश्वर मशाखेत्री, संपादक - राजेश खोब्रागडे यांनी सहकार्य केले.

Share News

copylock

Post Top Ad

-->