दि. ३१ जानेवारी २०२३
Vidarbha News India - VNI
PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महापालिकेत मेगा भरती, जाणून घ्या सविस्तर
विदर्भ न्यूज इंडिया
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध पदांच्या ९ हजार ७८५ जागांसाठी पदभरती होणार आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे की, राज्यातील पालिका प्रशासनामध्ये ४० हजार जागांसाठी पद भरती राबविण्यात आली आहे.
यात पिंपरी चिंचवड ही महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असून ही पालिका प्रशासन कर्मचाऱ्यांची मोठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. यात प्रामुख्याने लिपिक पदांचे मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत.
यात सुरक्षा रक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर, सफाईकामगार, कक्ष मदतनीस, अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सध्या राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यातील महापालिका प्रशासनातील रिक्त पदांचा आढावा घेण्यात येत आहे. यापैकी मुंबई महापालिकेत सर्वात जास्त पदे भरण्यात येणार आहेत तर त्यानंतर सर्वाधिक पद भरती पिंपरी चिंचवड महापालिकेत आहे.
PCMC Recruitment 2023
कधी होणार पदभरती
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व महापालिकेतील रिक्त पदांवर दि. १५ मे च्या आधी पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यासाठी आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, यानुसार पदांची भरती करण्यात येणार आहे.