दि. १५ जानेवारी २०२३
घोट येथे रात्रकालीन अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
विदर्भ न्यूज इंडिया
चामोर्शी / घोट : जय शिवाजी क्रिकेट क्लब घोटच्या वतीने दि. १४ जानेवारी २०२३ ते अंतिम सामन्यापर्यंत रात्र कालीन अंडरआर्म टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या खेळामध्ये प्रथम पारितोषिक ४१ हजार एक रुपये, द्वितीय पारितोषिक ३१ हजार एक रुपये तर तृतीय पारितोषिक २१ हजार एक रुपये हे ठेवण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ग्रामपंचायत चे सरपंच सौ. रूपालीताई दुधबावरे, उपसरपंच विजय बारसागडे, विशेष प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती श्री. प्रणयजी खुणे 'गायत्री कन्स्ट्रक्शन गोविंदपुर', सह उद्घाटक व प्रमुख पाहुणे श्री. संदीप रोंढे API एपीआय घोट, श्री. आनंद श्रीमंगलम PSI पीएसआय घोट, श्री. जनार्दनजी काळे पीएसआय घोट, या कार्यक्रमात, बंडू भांडेकर ग्रा.पं सदस्य घोट, सोनाली वाकडे ग्रा.पं सदस्य घोट, रेखा शेख ग्रा.पं सदस्य, शीतल दूधबावरे ग्रा.पं सदस्य, साईनाथ नेवारे माजी उपसरपंच ग्रा.पं घोट, हेमंत उपाध्य, दिनकर लाकडे, रविभाऊ सोमानकर, इत्यादी काही मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक जय शिवाजी क्रिकेट क्लब घोटचे अध्यक्ष केवलभाऊ गंद्देवार , साहिल शेख, हेमंत पत्रे, शुभम कोठारे, राज हीचामी, रोहित तिम्मा, अंकुश कुलेटी, लहू वेलादी, शरीफ शेख, दीपक दूधबावरे, तसेच इत्यादी सदस्य उपस्थित होते.