Nepal Plane Crash : आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात आले, खराब हवामान नाही तर विमान कोसळण्याचे 'हे' कारण ठरले ..! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Nepal Plane Crash : आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात आले, खराब हवामान नाही तर विमान कोसळण्याचे 'हे' कारण ठरले ..!

दि. १५ जानेवारी २०२३

VNI : Nepal

Nepal Plane Crash : आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात आले, खराब हवामान नाही तर विमान कोसळण्याचे 'हे' कारण ठरले ..!


पोखरा : नेपाळमधील पोखरा येथे यति एअरलाईन्सचे विमान कोसळले (Nepal Plane Crash). ताज्या माहितीनुसार, या अपघातानंतर आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

पोखरा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या अपघातात कोणीही वाचण्याची शक्यता नाही. पायलटने विमानाला शहरात अपघात होण्यापासून वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जेणेकरून नुकसान कमी होईल. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडू येथून पोखराच्या दिशेने जात होते. या विमानात 68 प्रवाशांसह एकूण 72 जण प्रवास करत होते. यति एअरलाइन्सचे एटीआर-72 विमान पोखरा विमानतळावर पोहोचण्याच्या 10 सेकंद आधी हा अपघात झाला. विशेष म्हणजे नेपाळच्या या पोखरा विमानतळाचे उद्घाटन अवघ्या 14 दिवसांपूर्वीच झाले होते. हा अपघात दिवसा 11.10 वाजता झाला. हे विमान पोखरा खोऱ्यातील सेती नदीच्या घाटात पडले.


हवामानामुळे नाही तर तांत्रिक बिघाडामुळे झाला अपघात

विमान दुर्घटनेचे कारण खराब हवामान नसून तांत्रिक बिघाड असल्याचे नेपाळच्या विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. विमानाच्या पायलटने लँडिंगसाठी एटीसीकडून परवानगी घेतल्याचेही विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. पोखरा एटीसीलाही लँडिंगसाठी ओके सांगण्यात आले. नागरी उड्डाण प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, लँडिंगच्या आधी विमानात ज्वाळा दिसत होत्या, त्यामुळे खराब हवामानामुळे हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही.

पंतप्रधान प्रचंड यांनी बोलावली तातडीची बैठक

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना प्रभावी बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेबाबत त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही बोलावली होती. पंतप्रधान प्रचंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत सरकारचे कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.

पंतप्रधान प्रचंड यांनी दौरा रद्द केला

पोखरा विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि गृहमंत्री रबी लामिछाने आज पोखराला भेट देणार होते. पण काही वेळातच नेपाळ सचिवालयाकडून सांगण्यात आले की, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि गृहमंत्री रबी लामिछाने यांचा पोखरा दौरा रद्द करण्यात आला आहे.

चीनच्या मदतीने बांधण्यात आला आहे पोखरा विमानतळ

मीडिया रिपोर्ट्सनुसार पोखरा विमानतळ चीनच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. त्याच्या बांधकामासाठी चीनच्या एक्झिम बँकेने नेपाळला कर्ज दिले होते. 1 जानेवारी 2023 रोजी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय आणखी एक माहिती अशी की, ज्या विमानाचा अपघात झाला त्याच विमानाचे डेमो फ्लाइट उद्घाटनाच्या दिवशी करण्यात आले होते. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.

पाच भारतीयांचाही समावेश

या विमानात 5 भारतीय नागरिकांसह 14 परदेशी प्रवासी होते. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलीस तसेच स्थानिक नागरिक बचाव कार्यात गुंतले आहेत. बचाव मोहिमेदरम्यान आतापर्यंत 64 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Share News

copylock

Post Top Ad

-->