काही आमदारांचं विमान एक-दोन वर्ष जमिनीवर उतरत नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

काही आमदारांचं विमान एक-दोन वर्ष जमिनीवर उतरत नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दि. १५ जानेवारी २०२३

Vidarbha News India - VNI

काही आमदारांचं विमान एक-दोन वर्ष जमिनीवर उतरत नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भ न्यूज इंडिया

DCM : Devendra Fadanvis

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची जागा वर्षानुवर्षे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लढते आणि भाजप त्यांना पाठिंबा देते...

यावर्षीही आपण आपलं समर्थन जाहीर केलं आहे. गाणार सर गेले बारा वर्ष काम करत आहेत. आमदार होण्यापूर्वी त्यांचा व्यवहार, वर्तन, कामाची पद्धत कशी होती, ती आमदार झाल्यानंतर ही बदललेली नाही... नाहीतर आजकाल काही आमदारांचं विमान एक-दोन वर्ष जमिनीवर उतरत नाही.. मात्र गाणार यांच्याबद्दल तसे झाले नाही, असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते.

गाणार यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा गैरव्यवहाराचा डाग लागलेला नाही. गाणार शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित प्रश्न आवर्जून उचलून धरतात. नाहीतर काही शिक्षक आमदार (सर्वच नाही) असे आहेत की त्यांना शिक्षकांच्या प्रश्नाऐवजी बिल्डरांच्या प्रश्नामध्ये जास्त रस असतो. मात्र गाणार फक्त आणि फक्त शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करतात.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं कौतुक करावं वाटतं. कारण त्यांना लाजच वाटत नाही. पेन्शनचा प्रश्न त्यांनीच निर्माण केला. 2010 मध्ये त्यांनीच पेन्शन बंद करण्याची योजना लागू केली.. त्याच्या आधीही त्यांचं सरकार होतं आणि त्यानंतरही त्यांच्याच सरकार सत्तेवर होतं... त्यांनी जुनी पेन्शन बंद केली, नवीन पेन्शनची योजना लागू केली आणि आता भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर असं वातावरण निर्माण करत आहेत, जणू भाजपनेच पेन्शन रद्द केली आहे.. पेन्शनचा निर्णय तडकाफडकीने घेत नाही.. कारण आपल्याला शिक्षकांचा, कामगारांचा, शेतकऱ्यांचा सर्वांचा भवितव्य पाहायचं आहे.. जुन्या पेन्शनचा निर्णय घेतला तर अडीच लाख कोटीचा बोजा पडेल.. तसं झाल्यास पगारही देता येणार नाही.. त्यामुळे मी सांगितले की आम्ही या संदर्भात विचारपूर्वक निर्णय करू.. तुम्ही जुनी पेन्शन योजना आज लागू करा असे म्हणणार असाल.. तर आज राज्याची परिस्थिती तशी नाही... मात्र भविष्यात नक्कीच राज्याचा आर्थिक विकास होऊन तशी स्थिती निर्माण होईल, ज्या वेगाने आपण थ्री ट्रिलियन इकॉनोमीकडे वाढतो आहे नक्कीच तशी अवस्था येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काही शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक अशा झाल्या, की लाज वाटते.. त्यात पैशाचा वापराला, इतरही काही गोष्टी झाल्या, त्यांचा उल्लेख इथे करताही येणार नाही.

मात्र नागो गाणार यांच्या दोन्ही निवडणुकांमध्ये कुठल्याही चुकीच्या गोष्टी न करता आपण प्रामाणिकपणे निवडून आलो, आणि यंदाही गाणारांच्या इमेज वर आणि कामावर आपण निवडणूक जिंकणार आहोत. आपल्याला निवडणूक अंगावर घ्यायची आहे, फक्त पाठिंबा देऊन थांबायचं नाहीये.. ही निवडणूक वैयक्तिक संबंधांवरच जिंकता येते.. त्यामुळे मंचावर बसलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की निवडणूक गांभीर्याने घ्या, आपण निश्चित जिंकू.. समोरच्यांची अवस्था तर अशी आहे की त्यांना अजूनही उमेदवार ठरवता येत नाही आहे.. रोज नवीन बातमी समोर येत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Share News

copylock

Post Top Ad

-->