भयानक घटना! बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सामूहिक कॉपीत शिक्षकसुद्धा सहभागी..बातमी सविस्तर वाचा... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

भयानक घटना! बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सामूहिक कॉपीत शिक्षकसुद्धा सहभागी..बातमी सविस्तर वाचा...

दि. २८.०२.२०२३

Vidarbha News India - VNI

पुण्यातील भयानक घटना, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सामूहिक कॉपीत शिक्षकसुद्धा सहभागी

विदर्भ न्यूज इंडिया

पुणे : सध्या राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, गेल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात वेगळंच चित्र पहायला मिळाले.

नांदेडमधील एका परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सामूहिक कॉपीत शिक्षकही सहभागी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड तालुक्यातील केडगावमधील प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव मधील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात 12 वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्याने स्थानिक 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 फेब्रुवारीला 12 वीची परीक्षा सुरू असताना भरारी पथकाने शाळेत भेट देऊन तपासणी केली असता वर्गात काही विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळून आले.

तसेच या सर्व प्रकाराला शाळेत उपस्थित असणारे शिक्षक अप्रत्यक्षरित्या जबाबदार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भरारी पथकातील प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी यवत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

या शिक्षकांवर गुन्हा दाखल - 1) जालिंदर नारायण काटे (परिक्षा केंद्र संचालक) 2) रावसाहेब शामराव भामरे (उपकेंद्र संचालक) 3) प्रकाश कुचेकर 4) विकास दिवेकर 5) शाम गोरगल 6) कविता काशीद 7) जयश्री गवळी 8) सुरेखा होन 9)अभय सोननवर या शिक्षकांवर महाराष्ट्र गैरव्यहार प्रतिबंधक कायदा सन 1982 (महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परिक्षा कायदा 1982 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

Share News

copylock

Post Top Ad

-->