दि.२८.०२.२०२३
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
विज्ञान दिवसाच्या निमित्ताने पोस्टर स्पर्धेचे आयोजन
प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे:कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : विद्यार्थी दशेत असतांना जे काही आपण शिकतो त्या शिकण्यातून वारंवार अनुभव घेत राहिले तर सतत ज्ञान वाढत राहते. या ज्ञानातूनच आपल्याला स्वतःची वाट निर्माण करावी लागते.विज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगताना प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. त्यामुळे त्याकडे बघतांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बघितले पाहिजे असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ.शैलैंद्र देव, प्राचार्य मॉडेल कॉलेज डॉ. शशिकांत आस्वाले उपस्थित होते.
सी.वी.रमण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
डॉ. शैलेंद्र देव यांनी यावेळी प्रास्ताविक केले तर डॉ. शशिकांत आस्वले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. नेहा सालोरकर,आभार प्रा. डॉ. रोशन नासरे यांनी मानले.
राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी संशोधनावर आधारित पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक पोस्टर्सचे महत्त्व जाणून घेत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विज्ञानावर आधारित या पोस्टर्स स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. देवदत्त तारे आणि प्रा.डॉ.संदीप कागे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.